Download App

टीम इंडियाचा सुपर फिनिशर केदार जाधवने धोनी स्टाईलने जाहीर केली निवृत्ती

भारतीय क्रिकेट टीममधील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

Kedar Jadhav Retirement : भारतीय क्रिकेट टीममधील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. केदार जाधवचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारा ठरला आहे. केदारने आज अचानकपणे हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे केदार जाधवने माजी कर्णधार एमएस धोनीच्या स्टाईलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. फेब्रुवारी 2020 मध्ये केदार टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर केदारचे पुन्हा संघात पुनरागमन झाले नाही.

केदार जाधवने भारतीय संघासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये केदारने 42.09 च्या सरासरीने आणि 101.61 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 389 रन केले आहेत. या बरोबरच गोलंदाजीत केदारने 27 विकेट्स घेतल्या आहेत.

 

follow us

वेब स्टोरीज