Team India WTC Final Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. आज सोमवार (30 डिसेंबर) या कसोटी सामन्याचा पाचवा (Team India) आणि शेवटचा दिवस आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याची शक्यता वाढेल. मात्र भारत हा सामना हरला तर त्याच्या अडचणी वाढतील.
भारत हरला तर काय होईल?
जर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी हरला, तर तो WTC गुणतालिकेत पूर्वीप्रमाणे तिसऱ्या स्थानावर राहील, परंतु त्याची विजयाची टक्केवारी 55.88 वरून 52.78 पर्यंत कमी होईल. मात्र, असे झाले तरी संघ WTC फायनलच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडणार नाही. त्यानंतर संघाला श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत करावे अशी प्रार्थना करावी लागेल.
IND vs AUS: रोहित शर्मा घेणार निवृत्ती? मुख्य निवडकर्ता अजित आगरकर मेलबर्नमध्ये दाखल
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव झाला, तर टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये होणारा पाचवा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. असे झाल्यास, बॉर्डर-गावसकर मालिका 2-2 अशी बरोबरीत राहील आणि तिची विजयाची टक्केवारी 55.26% असेल.
अनिर्णित राहिल्यास काय होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटी अनिर्णित राहिल्यास समीकरण पूर्णपणे बदलेल. जर हा सामना अनिर्णित राहिला आणि टीम इंडियाने सिडनी कसोटी जिंकली तर भारताची विजयाची टक्केवारी 57.017 होईल. या स्थितीत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला पुन्हा प्रार्थना करावी लागेल की ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत किमान एक सामना अनिर्णित रावा, त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी 55.36 राहील आणि त्यामुळे भारताच्या पात्रतेचा मार्ग मोकळा होईल.
दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिका सध्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये अव्वल आहे आणि त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 11 सामने खेळले असून या कालावधीत त्यांनी 7 सामने जिंकले आहेत, तर केवळ तीन सामने गमावले आहेत.