Virat Kohali ने अलिबागमध्ये खरेदी केला 6 कोटींचा आलिशान बंगला

अलिबाग : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2 हजार चौरस फुटाचा आलिशान बंगला 6 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त असल्याने, त्याचा भाऊ विकास कोहली याने अलिबाग उपनिबंधक कार्यालयाला भेट दिली आणि नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली आहे. कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. या […]

Untitled Design (2)

विराट कोहली

अलिबाग : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2 हजार चौरस फुटाचा आलिशान बंगला 6 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त असल्याने, त्याचा भाऊ विकास कोहली याने अलिबाग उपनिबंधक कार्यालयाला भेट दिली आणि नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली आहे.

कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. या मध्ये विराटला 400 स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही मिळणार आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे हे निवासस्थान पसंतीचे ठिकाण आहे. मांडवा जेटीपासून राहण्याची व्यवस्था 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. स्पीड बोटीने मुंबईचे अंतर आता 15 मिनिटांवर आहे.

अलिबाग परिसरात असलेला विराटचा हा बांगला अतिशय आलिशान आहे. यापूर्वी त्यांनी पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईतील वरळी भागातील ओंकार टॉवरमध्ये घर खरेदी केले होते.

‘हा तर पोरकटपणा’, भावी मुख्यमंत्री पदावर Sharad Pawar थेट बोलले 

विराटने या परिसरात खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी, विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गिरड गावात 36,059 चौरस फूट पसरलेले फार्महाऊस 19.24 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

Exit mobile version