Download App

Virat Kohli Bowling : हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त मैदान सोडलं, कोहलीनं पूर्ण केली ओव्हर..

Virat Kohli Bowling: वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) बॉलींग(Bowling) पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या बॅटींगच्या आधी क्रिकटप्रेमींना विराटची बॉलींग (Virat Kohli Bowling) पाहायला मिळाली.

Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्या हार्दिक पंड्याला दुखापत (Hardik Pandya injured)झाली. त्यामुळे पंड्या मैदानाबाहेर गेला. यावेळी विराट कोहलीने बॉलींग केली. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना बऱ्याच वर्षांनंतर कोहलीची बॉलींग पाहायला मिळाली. पुण्यातील सामन्यावेळी विराट कोहलीची बॉलींग पाहायला मिळाल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

बांग्लादेश विरुद्धचा सामना खेळत असताना नवव्या ओव्हरमध्ये बॉलींग करताना हार्दिक पंड्याला दुखापत झाली. त्यामुळे त्या ओव्हरमधील उर्वरीत बॉल टाकण्याची जबाबदारी स्टार खेळाडू विराट कोहलीने घेतली. कोहलीने लिटन दास आणइ तांझीद हसन यांना तीन बॉल टाकले. या तीन बॉलमध्ये या दोन्ही खेळाडूंना फक्त दोन धावा करता आल्या. विराटने एकदिवसीय सामन्यात तब्बल सहा वर्षानंतर बॉलींग केली आहे.

बांग्लादेशने नाणेफेक जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. या सामन्यात बॉलींग करताना हार्दिक पंड्याला दुखापत झाली. बॉल अडवताना पंड्याला मोठी दुखापत झाली. दरम्यान पंड्याला असह्य वेदना होत असल्याने मैदानावर येऊन डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

ठाण्यात मिळणार सर्वांना परवडणारी घरं! शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचे धडाकेबाज निर्णय…

त्यापुढेही पंड्याने पुन्हा बॉलींग करण्याचा निर्णय घेतला मात्र पंड्याला वेदना वाढल्यामुळे त्याला ती ओव्हर पू्र्ण करता आली नाही. त्यामुळे पंड्याची उर्वरीत ओव्हरमधील तीन बॉल विराटने टाकण्याचा निर्णय घेतला. आणि तब्बल सहा वर्षांनी बॉलींग करुनही विराटने तीन बॉलमध्ये फक्त दोनच धावा दिल्या.

Tags

follow us