Download App

एमएस धोनीच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारकाचे उद्घाटन, पाहा व्हिडिओ

  • Written By: Last Updated:
Wankhede Stadium In Vijay Smarak :एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 रोजी इतिहासाच्या सोनेरी पानात आपले नाव नोंदवले. श्रीलंकेचा पराभव करून भारताने दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हे विजेतेपद संघासाठी तसेच महान सचिन तेंडुलकरसाठी खूप खास होते कारण तो शेवटची स्पर्धा खेळत होता. फायनलमधील अनेक खास क्षण आजही चाहत्यांच्या हृदयात स्मरणात राहतील. पण धोनीने ज्या प्रकारे षटकार मारून डाव संपवला तो आजही प्रत्येक भारतीय चाहत्यांच्या स्मरणात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा क्षण लक्षात ठेवण्यासाठी विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेने 2011 च्या विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचे उद्घाटन महेंद्रसिंग धोनी याने आज स्वतः केले. याच ठिकाणी धोनीचा षटकार लगावला त्याचं ठिकाणी हे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील खुर्च्या देखील हटवण्यात आल्या आहेत.

अवकाळ्याचा पुन्हा एकदा तडाखा, पिके जमीनदोस्त, शेतकरी चिंताग्रस्त

महेंद्रसिंग धोनीचा ऐतिहासिक 2011 चा विश्वचषक फाइनलचा शेवटचा षटकार स्टँडवर पडलेल्या ठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले आहे. फायनलमध्ये धोनीच्या संस्मरणीय षटकार व्यतिरिक्त त्याने 91 धावांची दमदार खेळीही खेळली. यादरम्यान गौतम गंभीरने 97 धावांची लढाऊ खेळीही खेळली, ज्यामुळे भारत हा सामना आपल्या झोळीत टाकू शकला. यापूर्वी ICC ने धोनीला त्याच्या संस्मरणीय षटकारांसाठी फॅन क्रेझ डिजिटल कलेक्टिबल पुरस्काराने सन्मानित केले होते.

Tags

follow us