Download App

वर्ल्डकपसाठी वेस्टइंडिज सज्ज; संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा पण, मॅचविनरच गायब

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेस्टइंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. वेस्टइंडिजच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे.

West Indies T20 WC 24 Squad : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात (T20 World Cup 2024) होत आहे. या स्पर्धेसाठी वेस्टइंडिजने 15 सदस्यीय संघाची (West Indies) घोषणा केली. वेस्टइंडिजच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. क्रिकेट पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या शमर जोसेफला संघात जागा मिळाली आहे. रोवमन पॉवेलच्या हाती संघाची कमान आहे.

वेस्टइंडिज संघात अष्टपैलू खेळाडू आंद्र रसेल दिसणार आहे. आंद्रे रसेलने या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. शिमरोन हेटमायरलाही संधी मिळाली आहे. हेटमायर सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट लीगमध्ये राजस्थान संघाकडून खेळत आहे.

T20 World Cup : आम्ही फटाकेही घेतले आहेत पण…; 15 खेळांडूंमध्ये स्थान न मिळाल्याने रिंकूचे वडिल भावूक

यंदा काइल मेयर्सला संघात घेतले गेले नाही. वेगवाने गोलंदाज ओशाने थॉमस यालाही डच्चू दिला आहे. काइल मेयर्सऐवजी फलंदाजाला संधी मिळाली आहे. या संघात जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग आणि शाई होप या फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. निकोलस पूरन, पॉवेल, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड यांसारखे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. त्यामुळे यंदाचा वेस्टइंडिजचा संघ मजबूत दिसत आहे.

टी 20 वर्ल्डकपसाठी विंडीज संघ

रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्जारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, शाई होप, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड.

भारताला धक्का देत इंग्लंडच्या माजी कर्णधाराने T20 World Cup 2024 च्या उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ संघ

वेस्टइंडिज संघ निवडकर्त्यांनी यंदा अष्टपैलू खेळाडूंन संघात घेतले आहे. परंतु, आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या सुनील नारायणला संघात घेतलं नाही. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतात सुरू असलेल्या टी 20 लीगमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्याने विश्वचषकात खेळण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही. या कारणामुळेच निवडकर्त्यांनी त्याचा विचार केला नसावा अशी चर्चा सध्या सुरू आहे.

follow us

वेब स्टोरीज