IND vs NZ Final : आज नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे आयसीसी टी20 2026 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. आजचा अंतिम सामना ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आतापर्यंत कधीही न्यूझीलंडने ही स्पर्धा जिंकलेली नाही तर कोणत्याही संघाने आतापर्यंत सलग दोनदा ही स्पर्धा जिंकलेली नाही आणि कोणत्याही संघाने मायदेशात ही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.
अंतिम सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक अंतिम सामना (IND vs NZ Final) रविवार, 8 मार्च रोजी खेळला जाईल.
अंतिम सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक फायनल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. संध्याकाळी 6:30 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.
अंतिम सामना टीव्हीवर लाईव्ह कसा पाहायचा?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक फायनल विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही डीडी स्पोर्ट्स आणि डीडी फ्री डिशवर देखील मोफत सामना पाहू शकता.
अंतिम सामन्याची लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
तुम्ही जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी20 विश्वचषक फायनल लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
न्यूझीलंड संघ:
टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमीसन, ईश सोधी, जेकब डफी
भारतीय संघ:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव
