Asia Cup 2025 Trophy : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत नववे आशिया कप विजेतेपद पटकावले आहे. या रोमाचंक सामन्यात टिलक वर्माच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने बाजी मारली मात्र यानंतर पुरस्कार सोहळा वादग्रस्त ठरला. भारतीय खेळाडूंनी पीसीबी आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मोहसीन नक्वीवे ट्रॉफी हॉटेल रुममध्ये घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भारताने ट्रॉफीशिवाय विजय साजरा केला. मात्र त्यामुळे आता आशिया कप 2025 ची ट्रॉफी भारताला कधी मिळणार याबाबात सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भारताला ट्रॉफी मिळणार की नाही याबाबत आयसीसीचा नियम का सांगतो ते जाणून घ्या.
जर कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिले तर तो आयसीसीच्या (ICC) आचरसंहितेअंतर्गत येऊ शकते मात्र याबाबत काही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेट भावनेविरुद्ध असू शकते. नियमांनुसार आता भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) तो ट्रॉफी का स्वीकारत नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. यानंतर एसीसी (ACC) किंवा आयसीसी कोणत्याही कारवाईचा निर्णय घेईल.
सामना किंवा विजेतेपद जिंकल्यानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हा क्रिकेटच्या भावनेचा अनादर मानला जाऊ शकतो. आयसीसीच्या आचारसंहितेचा उद्देश हे रक्षण करणे आहे.
संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधीने आयसीसीला ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्याचे स्पष्ट आणि वैध कारण द्यावे. आयसीसी परिषदेत निषेध बीसीसीआय पुढील आयसीसी परिषदेत या घटनेबाबत अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवू शकते.
आयसीसीकडे अनुचित वर्तनासाठी शिस्तप्रिय प्रक्रिया आहे. ते आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत या परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात. हे निश्चित करेल की कोणतेही नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात.
लॉरेन्स बिश्नोई टोळीला धक्का, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी संघटना म्हणून घोषित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नोव्हेंबरमध्ये एसीसीच्या बैठकीत एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध तीव्र निषेध नोंदवेल. खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ती संघाला देऊ शकले असते.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, भारत त्यांच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. “आम्ही त्यांच्याकडून (मोहसिन नक्वी) ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु त्यामुळे त्यांना त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये नेण्याची परवानगी मिळत नाही,” असे ते म्हणाले.