Afghanistan Cricketers : पाकच्या हल्ल्यात ठार झालेले तीन खेळाडू होते अफगाण क्रिकेटसंघाचं भविष्य

Afghanistan Cricketers : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर

Afghanistan Cricketers

Afghanistan Cricketers

Afghanistan Cricketers : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई हल्ले सुरु झाले आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपठू ठार झाले तर चार जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर नोव्हेंबर पाकिस्तानविरुद्ध होणारी टी-20 सिरीज अफगाणिस्तानने रद्द केली आहे.

अफगाणिस्तानचा टी20 कर्णधार राशीद खानने (Rashid Khan) देखील बोर्डाच्या या निर्णयाचा स्वागत केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अफगाण क्रिकेटपटूंची ओळख पटवणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही क्रिकेटपटूंची ओळख कबीर, सिबगतुल्ला आणि हारुन अशी आहे. ते पक्तिकाची राजधानी शरण येथे एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी गेले होते.

क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्ला आणि हारून कोण होते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कबीर हा अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील एक तरुण क्रिकेटपटू होता.तो अफगाणिस्तानच्या घरगुती क्रिकेटमध्ये एक प्रतिभावान खेळाडू मानला जात होता असा दावा मीडिया रिपोर्ट्मध्ये करण्यात येत आहे. तर सिबगतुल्लाहबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही मात्र अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिबगतुल्लाहला अफगाणिस्तान क्रिकेटचे भविष्य असं म्हटले आहे.

तर हारून खान काबुलचा एक तरुण उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याने घरगुती आणि वयोगटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती. हारूनने लिस्ट ए, टी20 आणि प्रथम श्रेणी सामने खेळले आणि तो अफगाणिस्तान क्रिकेटचा उज्ज्वल भविष्यातील स्टार मानला जात होता.

शरद पवार क्रिकेट संग्रहालय रविवारी क्रिकेट प्रेमींसाठी खुले करण्यात येणार

सिरीजमधून माघार

घेतली पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात होणारी टी20 मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोर्डाने म्हटले आहे की, पीडितांच्या कुटुंबियांबरोबर आम्ही आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेनंतर एसीबीने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या टाई नेशन सिरीजमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सिरीजमध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा संघ सहभागी होणार होता.

Exit mobile version