Download App

“पैसे द्या अन् PSL भरवा..” कंगाल पाकिस्तानला ECB चा दणका; पडद्यामागं BCCI चाही रोल

माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.

Why ECB Declining PCB to host PSL 2025 : भारताच्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor)भयभीत झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट स्पर्धा स्थगित केली होती. या स्पर्धा दुबईत होतील अशी घोषणा बोर्डाने केली होती. परंतु, आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानला दुबईनेही जोरदार दणका दिला आहे. एमीरेट्स क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची विनंती धुडकावली आहे. माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता पीएसएल 2025 च्या आयोजनाची परवागनी देण्यास एमीरेट्स क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. क्रिकबजच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की भारताने ईसीबीवर दबाव टाकला होता. त्यानंतर ईसीबीचा निर्णय त्यानुसारच झाल्याचे दिसत आहे. यामागे बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह आणि त्यांचे यूएईच्या क्रिकेट बोर्डाशी असलेले संबंध कामी आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ब्रेकिंग : IPL 2025 स्थगित; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय

याआधी कोरोना काळात बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा दुबईत आयोजित केल्या होत्या. तसेच सन 2021 मध्ये टी 20 विश्वकप स्पर्धेचेही येथेच आयोजन केले होते. यासाठी आम्ही बीसीसीआय आणि जय शाह (Jay Shah) यांचे आभारी आहोत असे एका ईसीबीच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले.

follow us