PAK Women vs IND Women: आशिया कपच्या (Women’s Asia Cup) पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजयी सुरुवात केली. पाकने दिलेले 109 धावांचे टार्गेट भारताने 15 व्या ओव्हरमध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. प्रत्युत्तरात स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) यांनी तुफानी फलंदाजी केली. सलामीच्या या जोडीने 85 धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना 45 धावांवर बाद झाली. तिने 31 चेंडू खेळत नऊ चौकार मारले. त्यानंतर शेफाली वर्मा हिला दयालन हेमलता हिने साथ दिले. शेफाली वर्मा 40 धावांवर बाद झाली. तिने 29 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार मारले. विजय जवळ असताना हेमलता 14 धावांवर बाद झाली.
अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा ‘बाबू’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न
WOMEN'S ASIA CUP 2024. India (Women) Won by 7 Wicket(s) https://t.co/JtWHJ6zxhD #WomensAsiaCup2024 #INDvPAK
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2024
दीप्ती शर्मा, रिंकू, श्रेयंकासमोर पाक ‘फेल’
आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला अवघ्या 108 धावांवर रोखले आहे. पाक संघ 19.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाला. दीप्ती शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि रिंकू सिंग, श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकला पहिला झटका गुल फिरोजा हिच्या रुपात बसला. तिला पूजा वस्त्राकरने पाच धावांवर झेलबाद केले. तर मुनीबा अली हिला वस्त्राकरने 11 धावांवर तंबूत बाद केले.
‘मी मारलेले ओरखडे अनेकदा दिसत नाहीत’ वाघनखांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
पाकिस्तानचे दोन्ही फलंदाज अवघ्या 26 धावांवर तंबूत परतले. आलिया रिजाय हिच्या रुपाने तिसरा झटका बसला. 41 धावांत पाकिस्तानचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर तुबा हसन आणि फातिमा साना यांनी चांगली फलंदाज करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तुबा हसन 22 धावांवर बाद झाली. तर फातिमा सना हिने 22 धावांची नाबाद खेळी केली. परंतु पाक संघ संपूर्ण वीस ओव्हर खेळू शकला नाही.