Women’s Asia Cup: भारताने पाकला 108 धावांवर रोखले, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटीलची जबरदस्त गोलंदाजी

दीप्ती शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्रकर आणि रिंकू सिंग, श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Women's Asia Cup: भारताने पाकला 108 धावांवर रोखले, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटीलची जबरदस्त गोलंदाजी

India

PAK Women vs IND Women: महिला आशिया कपच्या (Women’s Asia Cup) पहिल्या सामन्यात भारताने ( IND Women) पाकिस्तानला (PAK Women) अवघ्या 108 धावांवर रोखले आहे. पाक संघ 19.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाला. दीप्ती शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्रकर आणि रिंकू सिंग, श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. 109 धावांच्या लक्ष्याचे पाठलाग करताना शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांमध्ये टीम इंडियाने 11 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजीला निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत पाकिस्तानला एकामागून एक धक्के दिले आहेत. पाकला पहिला झटका गुल फिरोजा हिच्या रुपात बसला. तिला पूजा वस्त्राकरने पाच धावांवर झेसबाद केले. तर मुनीबा अली हिला वस्त्राकरने 11 धावांवर तंबूत परतिवले. पाकिस्तानचे दोन्ही फलंदाज अवघ्या 26 धावांवर तंबूत परतले.

आलिया रिजाय हिच्या रुपाने तिसरा झटका बसला. 41 धावांत पाकिस्तानचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर तुबा हसन आणि फातिमा साना यांनी चांगली फलंदाज करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तुबा हसन 22 धावांवर बाद झाली. तर फातिमा सना हिने 22 धावांची नाबाद खेळी केली. परंतु पाक संघ संपूर्ण वीस ओव्हर खेळू शकला नाही.

भारतीय संघ-
स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंह

पाक संघ-सिदरा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली, निदा डार, आलिया रियाज, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इकबाल, नशरा संधू, सैयदा अरूब शाह

Exit mobile version