India vs Australia :अहमदाबाद : वर्ल्डकप (World cup 2023) जिंकण्यासाठी रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार आहेत. हा फायनलचा सामना प्रेक्षकांची सर्वाधिक क्षमता असलेल्या (1 लाख ३० हजार) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होतोय. त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. मैदानावर इतर कार्यक्रम कोणते होणार आहेत. ते जाणून घेऊया…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानांची उपस्थिती
हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर देशातील मोठे उद्योगपती, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहतील.
हवाई दलाचा थरार पाहा
भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करेल. सामना सुरु होण्यापूर्वी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींचा आनंद क्रिकेटप्रेमींना मिळेल.
World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!
आवाजाची जादूही मैदानात
सामन्यापूर्वी पॉप सिंगर दुआ लीपा आपल्या आवाजाची जादू दाखवणार. पहिल्या इनिंगच्या ड्रिंक्स ब्रेकनंतर आदित्य गढवी परफॉर्म करणार. पहिली इनिंग संपल्यानंतर प्रसिध्द गायक प्रीतम, जोनिता, नकाश अजीज, अमित मिश्रा, अकासा सिंह और तुषार जोशी परफॉर्म करतील. दुसऱ्या इनिंग ड्रिंक्स ब्रेकनंतर लेझर आणि लाइट शो.
IND vs AUS Final : महामुकाबल्यापूर्वी दोन्ही टीमसाठी रिव्हर क्रूझ डिनर, असा आहे स्पेशल मेनू
विश्वविजेत्या कर्णधारांचा गौरव
1975 ते 2019 पर्यंत वर्ल्डकप जिंकणाऱ्या कर्णधारांचा सन्मान होईल. वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांना एक विशेष ब्लेझर देणार. विडिंजचे क्लाइव्ह लॉईड (1975 आणि 1979), भारताचे कपिल देव (1983), ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर (1987), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (1996), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ (1999), रिकी पॉन्टिंग (2003 आणि 2007), भारताचा महेंद्रसिंग धोनी (2011), ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क (2015), इंग्लंडचा इऑन मॉर्गन (2019) या सर्वांना आमंत्रित करण्यात आलेय.