Download App

World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!

World Cup Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (World Cup Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचारी आणि अन्य स्टाफ मिळून 1.40 लाख लोक उपस्थित राहतील. इतकंच नाही तर हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सुद्धा हजर राहणार आहेत. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सामन्यादरम्यान एअर शो आणि वायू सेनेची सूर्य किरणे टीम स्टेडियमवरून मार्गक्रमण करील. तसेच लेजर लाईट शो देखील होणार आहे. परंतु, या सगळ्यात असा प्रश्न केला जात आहे की इतकी भव्य तयारी करण्याचा उद्देश काय आहे?

World Cup 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपसाठी भिडणार ! अटीतटीच्या सामन्यात आफ्रिका शेवटपर्यंत झुंजली

फायनल सामना स्मरणीय करण्यापाठीमागे एक कारण आहे आणि ते पीएम मोदींसंबंधित आहे. मोदी याआधी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्याच काळात भारतात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. हेच कारण आहे ज्यामुळे सामन्यादरम्यान लाईव्ह परफॉरमेंट, लेजर शो आणि आतिशबादी होईल.

2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांची तयारी गुजरात सरकारकडून केली जात आहे. यासाठी गोलम्पिक नावाने एक समितीही गठीत करण्यात आली आहे. त्यामुळेच आताच्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सरकारकडून पूर्ण ताकद लावली जात आहे. त्यासाठी विश्वचषकातील अंतिम सामन्याची मोठी संधी गुजरात सरकारकडे चालून आली आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानचे वर्ल्डकपमधून पॅकअप ! विजयी इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीट

सामन्याआधी 15 मिनिटांचा एअर शो 

नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथील सरदार पटेल स्पोर्टस् कॉम्पलेक्स मोटेरो येथे आहे. आता येथपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे. राज्य सरकार सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्सला स्पोर्ट्स हब बनविण्याच्या दिशेने काम करत आहे. याच कारणामुळे आयसीसीने अंतिम सामन्यासाठी पूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. सामन्यातील दुसरी इनिंग संपल्यानंतर लेजर आणि लाईट शो होईल. सामन्याआधी पंधरा मिनिटांचा एअर शो होईल.

एका दिवसाचं भाडं एक लाख रुपये 

विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता रविवारी दोन्ही संघात फायनल सामना होणार आहे. जो जिंकेल वर्ल्डकप त्याचाच. तेव्हा दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. क्रिकेटप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जण सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल होत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. येथील हॉटेल्सचे दर मात्र प्रचंड वाढले आहेत. सामन्याची तिकीटं मिळणंही सोपं राहिलेलं नाही. मोठ्या मुश्किलीनं तिकीटं मिळतात. त्यात पुन्हा या कृत्रिम महागाईचाही फटका चाहत्यांना बसत आहे. एरव्ही 500 ते 700 रुपये प्रति दिवस भाडं असणाऱ्या हॉटेल्सचे दर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लक्झरी हॉटेल्समध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचे तब्बल 1 लाख रुपये घेतले जात आहेत.

follow us