Download App

Wrestlers Protest : एफआयआर म्हणजे न्याय नाही, बृजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Wrestler Protest A Case Has Been Registered Against Brijbhushan Singh Under Pocso : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं.

भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या विरोधात हे पहिलवान मैदानात उतरले होते. दरम्यान कुस्तीपटूंच्या तक्रारी सोडवण्याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.

मात्र आता पुन्हा दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी सोमवारी पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा (Bhupinder Singh Hooda)यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal)आणि इतर नेत्यांनीही दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

BJP ने विषाचा महायज्ञ मांडला, मोदी पुंगी वाजवतात, भक्त डोलतात; सामनातून भाजपवर टीकास्त्र

भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र हा गुन्हा दाखल झाला असला तरी देखील यातून न्याय मिळणार नाही. त्यामुळे जोपर्यंत खासदार बृजभूषण सिंह यांना अटक होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. असा पवित्रा या कुस्तीपटुंनी घेतला आहे. यावर पहिलवान सत्यव्रत कादियानने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एफआयआर दाखल झाला हे चांगल आहे. पण यातून आम्हाला काय मिळणार दिल्ली पोलिसांनी हे पहिल्या दिवशी करायला हवे होते. यावर आमची लीगल टीम काय म्हणते ते पाहुयात. कुस्तीपटुंचं भविष्य सुरक्षित आणि राजकारण आणि कुस्ती वेगवेगळं ठेवायला हवं अशी प्रतिक्रिया या कुस्तीपटुंनी दिली आहे.

Tags

follow us