Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह भावूक, म्हणाले…

Wrestlers Protest : दिल्‍लीच्‍या (Delhi)जंतर-मंतर (Jantar-Mantar)मैदानावर 23 एप्रिलपासून ब्रिजभूषण सिंह यांच्‍या विरोधात देशातील कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest)सुरु आहे. कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी ते धरणे आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआय नोंदवले आहेत. एक एफआयआर (FIR)अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून तर दुसरी […]

Brijbhushan Singh

Brijbhushan Singh

Wrestlers Protest : दिल्‍लीच्‍या (Delhi)जंतर-मंतर (Jantar-Mantar)मैदानावर 23 एप्रिलपासून ब्रिजभूषण सिंह यांच्‍या विरोधात देशातील कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest)सुरु आहे. कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी ते धरणे आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआय नोंदवले आहेत. एक एफआयआर (FIR)अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून तर दुसरी एफआयआर उर्वरित महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून नोंदवली आहे. त्यातच खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसांत म्हणजेच 5 जूनला अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये (Ramkatha Park)चेतना महारॅली (Consciousness rally)बोलावली आहे. रॅलीत भारतातील नामवंत संत आणि 11 लाख लोकांचा जनसमुदाय जमणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वडिलांची चहाची टपरी, मराठी शाळेत शिकला अन् यूपीएससीला गवसणी, अहमदनगरच्या मंगेश खिल्लारीची यशोगाथा

या दरम्यान खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आज (23 मे) मोठे वक्तव्य केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगटला मंथरा म्हटले. ब्रिजभूषण म्हणाले की, रामाच्या वनवासात मंथरा आणि कैकेयी यांच्या भूमिका होत्या, यावेळी विनेश फोगट मंथरा म्हणून आली आहे. प्रभू रामाचा राज्याभिषेक झाला असता तर ते मर्यादा पुरुषोत्तम होऊ शकले नसते, असेही ते म्हणाले.

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेस नेते भूपिंदर हुड्डा यांच्यावर कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. आपल्यावर लावलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, पोलीस तपास करत आहेत, पोलीस आपले काम करतील.

भाजप खासदार ब्रिजभूषण एका कार्यक्रमात स्टेजवर बोलतानाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे लोक आत्महत्या करत असल्याचे खासदार म्हणाले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कायद्यामुळे हैराण झाले आहेत. या वयात मला दुसरी लढाई लढायची आहे, असेही ते म्हणाले.

अयोध्येत 5 जूनला होणाऱ्या जन चेतना रॅलीच्या तयारीच्या बैठकीला पोहोचलेले ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, आम्ही कुस्तीपटूंवर करोडो रुपये खर्च केले, जे पाया पडायचे आज त्यांची भाषा बदलली आहे. चेतना रॅलीमध्ये संतांनी 11 लाख लोकांना बोलावले आहे. ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, 5 जूनला अयोध्येत संत बोलतील आणि सगळे ऐकतील.

ब्रिजभूषण सिंह सुरुवातीपासूनच आपल्यावर लावलेले आरोप फेटाळत आले आहेत. दोषी सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा देण्याचेही ते बोलत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितले आहे. फेसबुकवर स्वत:चा एक फोटो शेअर करत त्यांनी सांगितले आहे की, ते नार्को किंवा लाय डिटेक्टर चाचणीसाठी तयार आहेत, मात्र बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही हीच चाचणी घ्यावी लागेल, अशी अट त्यांनी यावेळी घातली आहे.

Exit mobile version