WTC Final : लबुशेन डगआऊटमध्ये झोपला, सिराजच्या चेंडूने उडवली झोप, पहा व्हिडिओ

WTC Final 2023, India vs Australia:  जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 173 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने 2 धावांवर पहिला विकेट गमावली. दरम्यान, मारांश लाबुशेन (Marnus Labuschagne) ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याचा व्हिडिओ […]

WhatsApp Image 2023 06 09 At 10.49.00 PM

WhatsApp Image 2023 06 09 At 10.49.00 PM

WTC Final 2023, India vs Australia:  जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 173 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने 2 धावांवर पहिला विकेट गमावली. दरम्यान, मारांश लाबुशेन (Marnus Labuschagne) ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.(wtc-final-2023-marnus-labuschagne-was-sleeping-and-interrupted-by-mohammed-siraj-during-the-india-vs-australia)

त्याच्या फलंदाजीची वाट पाहण्याआधी, मार्नस लॅबुशेन तयार होत होता आणि ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत आरामात झोपला होता. दरम्यान, मोहम्मद सिराजने डावाच्या चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. मारांश लबुशेन स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा आवाज ऐकून तो अचानक जागा झाला. या मजेशीर घटनेने सर्वांनाच हसू फुटले.

मारांश लबुशेन खूप गाढ झोपेत होता आणि अचानक उठल्यानंतर घाईत हातमोजे घालून फलंदाजीला उतरला. लाबुशेनला पूर्णपणे झोपेतून उठवण्यासाठी सिराजने त्याच्यावर असा चेंडू टाकला की त्याची बॅट हातातून सुटली.

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, CSK च्या स्टार गोलंदाजाला संधी

रहाणे आणि शार्दुलने भारतीय डावात महत्त्वाची भूमिका बजावली

अंतिम सामन्यातील भारतीय संघाच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे झाले तर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकांनी 296 धावांपर्यंत मजल मारली. रहाणेने 89 तर शार्दुलने 51 धावा केल्या. दोघांमध्ये 7व्या विकेटसाठी 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कॅप्टन कमिन्सने 3 तर स्कॉट बोलँड, मिचेल स्टार्क, कॅमेरून ग्रीनने 2-2 आणि नॅथन लायनने 1 बळी घेतला.

Exit mobile version