Amol Kolhe : मानो या ना मानो, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. View this post […]

Dr. Amol Kolhe

Dr. Amol Kolhe (1)

मुंबई : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत.

सोशल मिडीयावर देखील खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते काही एमआरआय रिपोर्ट्स तपासत आहेत. कारण अमोल कोल्हे हे खासदार आणि अभिनेते असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतलेली आहे.

TV Serial : ‘या’ मालिकेत सुयश टिळक साकारणार खलनायक !

या व्हिडीओला कॅप्शन देताना अमोल कोल्हे यांनी लिहिले आहे की, ‘दुखावलेली मान संभाळत एमबीबीएसमध्ये शिकवलेलं काही आठवतयं का ? याची खात्री करून पाहिली. स्वतःचे एमआरआय रिपोर्ट्स पाहून (शेवटी पर्याय आहेच- रेडिऑलॉजिस्टने दिलेला रिपोर्ट वाचणे.) मानो या ना मानो.’ या कॅप्शनवरून हे लक्षात येत आहे की, अमोल कोल्हे यांना मानेला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट करत काळजी घ्या असं लिहिलं आहे.

Exit mobile version