आकडेवारीत अन् जमिनीवर मोठा फरक; पुणे गुन्हेगारीवरून आयुक्तांच्या पत्राला सुप्रिया सुळेंचं पत्राने उत्तर

पत्रात त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने घसरत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली आहे.

PUNE Ayukat

आकडेवारीत अन् जमिनीवर मोठा फरक; पुणे गुन्हेगारीवरून आयुक्तांच्या पत्राला सुप्रिया सुळेंचं पत्राने उत्तर

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आलं आहे. पुणे शहर गुन्हेगारांची राजधानी होत आहे, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. सुळेंच्या या टीकेला आणि आरोपांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट 9 पानांचं पत्र लिहून सडेतोड उत्तर दिलं आहे.

पत्रात त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने घसरत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली आहे. त्यावर लगेच सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिाय दिली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण सादर केलेली आकडेवारी ही प्रशासकीय दृष्टीकोणातून महत्वाची आहे. परंतु, मी थेट जनतेशी जोडली असल्याने मला जमिनीवरील वास्तव वेगळं दिसत आहे. नागरिक भीतीच्या वातापरणात जगत आहेत. आपली आकडेवारी आणि नागरिकांचा प्रत्यक्ष अनुभव यामध्ये मोठी तफावत आहे असं सुळे म्हणाल्या आहेत.

Exit mobile version