Download App

Jayant Patil : जयंत पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना उचकवले

मुंबई ः महाविकास आघाडीकडून २०२४ ला मुख्यमंत्री काेण हाेणार, या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा आम्ही तीन पक्ष विचार करुन ठरवणार आहे. मात्र, भाजपकडून २०२४ ला देवेंद्र फडणवीस की सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री हाेणार आहेत, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना उचकावले. तसेच  देवेंद्र फडणवीस यांना लाईटली घेऊ नका, ते कधी या सगळ्यांना पोहचवून येतील सांगता येत नाही, असा टाेलाही त्यांनी लगावला.

‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जयंत पाटील बाेलत हाेते. जयंत पाटील यांनी भाजपकडून २०२४ ला देवेंद्र फडणवीस की सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री हाेणार आहेत, असे म्हणत समाेर बसलेले सुधीर मुनगंटीवार यांना उचकावले. त्याचबराेबर याचे उत्तर दाेघांनाही सांगता येणार नाही. ते फक्त एकाच व्यक्तीला माहित आहे, असे म्हणत उत्सुकता ताणली.

जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबराेबर सरकार बनवताना आता चांगली संधी आली हाेती. मात्र, भाजपवाल्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री हाेऊ दिले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना लाईटली घेऊ नका, ते कधी या सगळ्यांना पोहचवून येतील सांगता येत नाही, असे व्यक्तिमत्व आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी आतापर्यंत अर्थमंत्री, वनमंत्री त्याचबराेबर इतरही अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. त्यांनी याचा विचार करायला हवा. मात्र, ते आक्रमक हाेत नाही, अशा काेपरखळ्या करत चिमटे काढले.

Tags

follow us