Download App

‘आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही पण, CM अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी’.. जरांगेंनी काय सांगितलं ?

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईला निघाले आहेत. सध्या जरांगे पाटील लोणावळ्यात आहेत. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्याची बातमी आली. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत या वृत्ताचे खंडण केले. कोण म्हणलं परवानगी नाकारली. परवानगी दिली आहे. त्याठिकाणी स्टेज बांधण्याचंही काम सुरू आहे. मुंबईला (Mumbai) जाण्याची हौस आम्हाला नाही. आरक्षण द्या गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. आम्हाला आंदोलन करायचं आहे आणि तोडगाही काढायचा आहे. म्हणून लोणावळ्यात थांबलो होतो. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता तुम्हीच लक्ष घाला असे आवाहन केले. या तिघांपैकी एकाने तरी यावे आणि तोडगा काढावा, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange : आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर.. जरांगेंचे सरकारला रोखठोक प्रत्युत्तर

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही काय मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नये. यामुळे तोडगा काढा. समाजाच्यावतीने माझी विनंती आहे की मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी चर्चा करावी. लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघांपैकी कुणीही एकाने यावं पण तोडगा काढावा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. परंतु, आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. जरांगे पाटील कोणत्याही नोटिसीला किंवा कारवाईला घाबरत नाहीत असे सांगितले. आझाद मैदानावर परवानगी मिळाली आहे. स्टेज आणि मंडप उभारण्याचेही काम तिथे सुरू आहे. माझे आताच तेथील लोकांशी बोलणे झाले आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Sangharsyoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

Tags

follow us