Download App

Manoj Jarange : ‘ट्रॅप रचणाऱ्यांची नावे मुंबईत जाहीर करणार’; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Image Credit: Letsupp

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखो (Manoj Jarange) समाजबांधवांसह मुंबईकडे निघाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील पु्ण्यात दाखल झाले आहेत. येथून पुढे लोणावळ्याला मुक्काम राहणार आहे. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुंबईतील उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजात फूट (Maratha Reservation) पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

‘सरकारकडून माझ्यावर ट्रॅप लावला जातोय’ मुंबईतील आंदोलनाआधी जरांगेंचा गंभीर आरोप

जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात आहे. माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावांचा लवकरच गौप्यस्फोट करणार आहोत. या लोकांची नावे मुंबईत पोहोचल्यानंतर जाहीर करणार आहोत. नेत्यांनी मराठा बांधवांचा फक्त वापर केला. तेव्हा आता शहाणे व्हा आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करू नका. नेत्यांची मुलं परदेशात शिकली पण आपल्या मुलांचं काय असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, याआधी जरांगे पाटील यांनी मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असे प्लॅनिंग सुरू आहे. पण आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या ट्रॅप रचणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशारा दिला  आहे.

Manoj Jarange : ‘दादागिरी करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा

follow us

वेब स्टोरीज