Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर’.. जरांगेंचे सरकारला रोखठोक प्रत्युत्तर

Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर’.. जरांगेंचे सरकारला रोखठोक प्रत्युत्तर

Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद करायला थोडेच चाललो आहोत. त्यांना बंद करायची असेल तर यावं. आम्ही आमच्या मागणीसाठी चाललो आहोत. लोकांचं जगणं सोयीच व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आहोत. कारण हा प्रश्न आमच्या एकट्याचाच नाही तर शहरांत राहणाऱ्या लोकांचाही हा प्रश्न आहे. आम्ही फक्त एकच दिवस जाणार आहोत तुम्हाला त्रास व्हावा ही आमची भावना नाही. तुम्हाला न्याय मिळावा म्हणूनच आम्ही मुंबईला चाललो आहोत’, अशा स्पष्ट शब्दांत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारला उत्तर दिले. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. आज त्यांचे पुण्यात आगमन झाले. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारला जोरदार उत्तर दिले.

मुंबई शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याच्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले, मोठ्या शहरात जमावबंदी लावलीच जात असते. परंतु,लोकशाही मार्गाने एखादी मागणी करणे हा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यामुळे आम्ही मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणारच (Maratha Reservation) आहोत. मी आधीपासूनच सांगत आहे की आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. मी कोणती वेगळी मागणी केली ते आधी सांगा. आमच्या हेकाफेका नाहीत. सगेसोयऱ्यांचा शब्द न्यायाधीशांनी सुद्धा घेतला आहे. आम्ही दिलेला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दांवर आम्ही बोलतोय पण सरकारकडून मात्र त्यानुसार काम होत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

पहाटे चार वाजता दीड तास खलबत; सरकारचा तीन कलमी प्रस्ताव फेटाळत जरांगे पुण्यात दाखल

अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू मात्र जरांगे पाटील वेळ देत नाहीत असे सरकारचे म्हणणे असल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर जरांगे पाटील म्हणाले,  सात महिने वेळ दिला आणखी किती द्यायचा. महाराष्ट्रात यापेक्षा जास्त वेळ एखाद्या आंदोलकाने दिला असेल तर मला दाखवा. नोंद सापडल्या तर सरकारने तसे लोकांनाही सांगावे. ते आमचे काम नाही. 54 लाख नोंदी सापडल्याचे तुम्ही म्हणता तर प्रमाणपत्र का वितरीत केले गेले नाहीत असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

नोंदी सापडल्या तर आरक्षण द्या 

आमच्या नोंदी सापडल्या आहेत तर आता आम्हाला ओबीसी आरक्षणात घेणं सरकारला क्रमप्राप्त आहे. आमच्या नोंदी सापडल्या त्यानंतर आम्ही आरक्षणात घ्या म्हणतोय हे कायद्याला सोडून आहे का? मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या तर आता आम्हाला पुन्हा आंदोलन करायला लावण्यापेक्षा आरक्षण द्या हेच आम्ही म्हणत आहोत, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Sangharsyoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

भुजबळांशी माझे वैयक्तिक वाद नाही 

भुजबळ आणि माझं काही वैयक्तिक भांडण नाही. आमचा विरोध विचाराला आहे. ते पण मागे एकदा तुम्हाला दाखवतो म्हणाले होते. म्हटलं मग या अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उत्तर दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज