Rajinikanth : उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘थलायवा’ मातोश्रीवर !

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनिकांत सध्या जरी मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. तरी देखील ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राजकारणात देखील त्यांच्या नेहमी चर्चा असतात. यावेळी ते आता अशाच एका राजकीय विषयामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते रजनिकांत यांनी नुकतीच मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. View this […]

Rajanikant Udhav

Rajanikant Udhav

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनिकांत सध्या जरी मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. तरी देखील ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राजकारणात देखील त्यांच्या नेहमी चर्चा असतात. यावेळी ते आता अशाच एका राजकीय विषयामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेते रजनिकांत यांनी नुकतीच मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

रजनिकांत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली हा फोटो माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रजनीकांत जी पुन्हा एकदा मातोश्रीवर आले. खुप आनंद झाला’ असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरें, रश्मी ठाकरे, अभिनेते रजनिकांत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील दिसत आहेत.

Udhav Thackeray : गद्दारांचा पक्षावरील दावा निवडणूक आयोग कसा गृहीत धरत आहे ?

ही भेट एक सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. या अगोदर देखील रजनिकांत हे बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आलेले आहेत. पण आता रजनिकांत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.

Exit mobile version