Download App

Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, राम चरण म्हणाला…

  • Written By: Last Updated:

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या एसएस राजमौली यांच्यासह अमेरिकेमध्ये आहे. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्कर अवॉर्डसाठी ते अमेरिकेत गेले आहेत. त्यांच्याकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर राम चरणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चे प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएम केरावनी यांच्या या गाण्याला 95 व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.

नुकतच संगण्यात आलं होतं की, रिहाना तिच्या ऑस्कर-नॉमिनेट सॉन्ग लिफ्ट मी अप फ्रॉम ब्लैक पैंथर: वकंडा फॉरएवरवर परफॉर्म करणार आहे. तर सोफिया कार्सन ‘टेल इट लाइक अ वुमन’ चित्रपटाचं नॉमिनेट सॉन्ग ‘अपलॉज’ वर डायनेसह परफॉर्म करणार आहे. त्याचबरोबर अकादमीचे सीईओ बिल क्रेमर यांनी बेस्ट इन शो पॉडकास्टवर सांगितले की त्यांच्याकडून सर्व नॉमिनेट गाण्यांचे लाईव्ह परफॉर्म ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Marathi Movie : ‘घर बंदूक बिरयानी’मधील गाणं तेलुगू, तामिळमध्ये प्रदर्शित

याबद्दल सोशन मिडीयावर , राम चरणने सांगितले की, ‘आम्ही कोठेही ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करू, ज्यासाठी आमचे खूप कौतुक होत आहे. कारण आम्हाला सर्वत्र परफॉर्म करण्याची संधी मिळत नाही. पण ऑस्कर सोहळ्यात जर आम्हाला त्यावर नाचण्याची संधी मिळाली, तर आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आम्हाला खूप आनंद मिळेल. स्टेजवर संपूर्ण गाण्यावर नृत्य करणे कठीण होईल. कारण त्यासाठी भरपूर श्वास आणि ऊर्जा लागते. पण नक्कीच हुक स्टेप्स नक्की करू. असंही तो म्हटला.

‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ हे गाणे राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यावर या स्टार्सच्या डान्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ‘नाटू नाटू’ या गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे शीर्षक पटकावले. प्रेम रक्षित यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. जे युक्रेनमधील कीव येथील मारिन्स्की पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आले आहे.

Tags

follow us