Israel Palestine Conflict : तीव्र संघर्षाची सुन्न करणारी कहाणी…

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. होय पुन्हा कारण हा वाद काही आजचा नाही. हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. आता इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत हमासचे कंबरडे मोडण्याचा प्लॅन आखला आहे. मात्र हा वाद काय आहे? ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे? या युद्धाचा जग आणि […]

Israel Palestine Conflict

Israel Palestine Conflict

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. होय पुन्हा कारण हा वाद काही आजचा नाही. हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. आता इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत हमासचे कंबरडे मोडण्याचा प्लॅन आखला आहे. मात्र हा वाद काय आहे? ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे? या युद्धाचा जग आणि भारतावर काय परिणाम होणार? जाणून घेऊ सविस्तर…

https://youtu.be/PCA55ahwZh8?si=qfdaIyjis5dKCyjU

जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही देशात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम जगातील इतर देशांवरही होतो. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या नुकसानातून अद्यापही जग सावरले नसताना इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले. इस्रायल आणि गाझामधील युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला आहे. तसेच सोन्या-चांदीच्या बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात स्वस्त सोन्याच्या आशेवर पाणी फिरू शकते. त्यामुळे मंडळी इस्त्रायल पॅलेस्टाईन वादाबाबत तुम्हाला काय वाटतं?

Exit mobile version