Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?

बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पठाण जवानची दमदार कामगिरी पाहता ‘हे’ वर्ष […]

10

10

बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

पठाण जवानची दमदार कामगिरी पाहता ‘हे’ वर्ष शाहरुखचंच होतं असं म्हणावं लागेल. कारण या अगोदर शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर ‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून त्याने जोरदार कमबॅक केलं. जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. त्यानंतर त्याचा ‘जवान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडला. आता त्याचा ‘डंकी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Exit mobile version