Download App

छत्तीसगडमध्ये टफ फाईट; काँग्रेस-भाजपला समसमान जागा; कोण होणार मुख्यमंत्री?

Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result ) प्रस्थापित काँग्रेसला भाजपने टफ फाईट दिली असल्याचं निकालावरुन दिसून येत आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसने 41 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपही मागे राहिल्याचं दिसून आलं नाही. भाजपनेही 47 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर दोन जागांवर इतर उमेदवारांची वर्णी लागलीयं. छत्तीसगडमध्ये भाजपने जादूच केल्याचं पाहायला मिळालं आहे. ही आकडेवारी सकाळी 11 वाजताची असून अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत.

छत्तीसगडमध्ये 2018 साली काँग्रेसने सत्ता खेचून आणली होती. भाजपचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांनी (2003 -2018) या काळात सत्ता गाजवली, मात्र, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत विजयाचा झेंडा फडकावला होता. त्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या निवडणुकीत मात्र, भाजपने काँग्रेसला चांगलीच चुरस देत समसमान जागांवर विजय निश्चित केला आहे.

Hasan Mushrif : अजितदादांनी पवारांची सुपारी घेण्याचा प्रश्नच नाही; अनिल देशमुखांच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

छत्तीसगडमध्ये एकूण 90 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच 75.8 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे पुरुष मतदारांपैकी महिला मतदारांचा अधिक कल यंदाच्या मतदानात दिसून आला आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पराभव पण, दणका पाकिस्तानला! टीम इंडियाला मिळाला पहिला नंबर

दोन दिवसांपूर्वीच निवडणूक निकालांचे एक्झिट पोल समोर आले होते. इंडिया टुडे आणि माय इंडिया संस्थांच्या पोलनूसार काँग्रेसला 40-50 जागा तर भाजपला 36-40 जागा मिळणार असल्याचं दिसून आलं होतं. एक्झिट पोलनूसार भाजप-काँग्रेसमध्ये चुरस असल्याचं सांगण्यात येत होतं. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरल्याचं आजच्या निकालावरुन दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेसकडून मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांचा चेहरा असल्याचं बोललं जात आहे. आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसला इतर 2 उमेदवारांना सोबत घेत आमदारांचं संख्याबळ सिद्ध करुन मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, लागणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार बसणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Tags

follow us