Download App

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पराभव पण, दणका पाकिस्तानला! टीम इंडियाला मिळाला पहिला नंबर

IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने काल चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव (IND vs AUS 4th T20I) करत मालिका विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाने 175 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणयासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघाला फक्त 154 धावाच करता आल्या. या विजयामुळे विश्वचषक गमावल्याचे दुःख काही प्रमाणात हलके होण्यास नक्कीच मदत मिळेल. ऑस्ट्रेलियावर मालिका विजयाबरोबरच टीम इंडियाने (Team India) आणखी एक रेकॉर्ड केले आहे. भारतीय संघ सर्वाधिक टी 20 सामने जिंकणारा संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या (Pakistan) नावावर होता. मात्र भारताने सरस कामगिरी करत पाकिस्तानला पछाडून नंबर एकचा मान मिळवला आहे.

AUS vs IND : ‘यंग ब्रिगेड’ने ऑस्ट्रेलियाला लोळवले ! भारताने टी-20 मालिका जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील रायपूर येथे झालेला चौथा सामना भारताने काल जिंकला. याचबरोबर या मालिकेत भारताने 3-1 ने आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली आहे. विश्वचषक काबीज करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी हा धक्कादायक पराभव आहे.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने चार षटकांत एक बाद 42 धावा केल्या होत्या. भारताला रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने पहिले यश मिळवून दिले. त्याने जोश फिलिपला तंबूत परतविले. तर अक्षर पटेलने ट्रॅविड हेडला (Travis Head) बाद केले. हेड 16 चेंडूत 30 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 44 धावसंख्येवर दुसरा झटका बसला. त्यानंतरही अक्षर पटेलने आपल्या दुसऱ्याच षटकात ऑरेन हार्डी याला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षरने बेनला बाद करून चौथे यश मिळवून दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. ऑस्ट्रेलियाचे अव्वल चार फलंदाज 89 धावांत तंबूत परतले. त्यामुळे भारताने या सामन्यात आपली पकड मजबूत केली. टीम डेव्हिड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ सात बाद 154 धावा करू शकल्या. हा सामना भारताने 20 धावांनी जिंकला. अक्षर पटेलने तीन, तर दीपक चहरने दोन बळी घेतले आहेत.

IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरचं कमबॅक; कुणाचा पत्ता होणार कट ?

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या आहेत. टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाडने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे भारताने या सामन्यात 174 धावांपर्यंत मजल मारली.

Tags

follow us