Download App

Hasan Mushrif : अजितदादांनी पवारांची सुपारी घेण्याचा प्रश्नच नाही; अनिल देशमुखांच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

Hasan Mushrif On Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP)हा भाजपबरोबर (BJP)जाण्यासाठी अनेक वर्षापासून तयार होता. त्यामुळे अजितदादांनी (Ajit Pawar)शरद पवारांना (Sharad Pawar)राजकीदृष्ट्या संपवण्याची सुपारी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी सांगितले. कर्जतमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चिंतन शिबीर झाले. त्यामध्ये अजितदादांनी शरद पवारांवर थेट गंभीर आरोप केले. त्यावर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, भाजपने शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची सुपारी अजितदादांना दिल्याचे म्हटले, त्याला आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)माध्यमांशी संवाद साधला.

Maratha Reservation : …तोपर्यंत जरांगेंनी जरा सबुरी ठेवावी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा सल्ला

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडली. ते म्हणाले की, कर्जतमधील चिंतन शिबीरामध्ये अजितदादांनी जे सांगितलं ते वस्तुस्थितीला धरुनच आहे. आमच्या सोबत अनिल देशमुख देखील येणार होते पण त्यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजपने नकार दिला, त्यामुळे त्यांनीही आमच्यासोबत येण्यास नकार दिला, त्यांनी इतकं खोटं बोलू नये असेही यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

कोणी सोडून गेलं म्हणून चिंता करण्याचे कारण नाही, संघटना स्वच्छ झाली, शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुका लढवण्याबद्दल ते म्हणाले की आता ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत, त्या ठिकाणच्या जागा आम्हीच लढवणार आहोत, त्यामध्ये बारामतीसुद्धा आहे. बारामतीत गृहकलहाचा प्रश्नच येत नाही, नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान होण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावेच लागेल असेही यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

त्याचवेळी सातारा ते कोल्हापूर सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचं नॅशनल हायवे अॅथोरिटीमार्फत काम सुरु झालेलं आहे. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पूलावर आणि कागलच्या स्टॅन्डजवळील पूलावर महामार्गाची उंची भराव घालून वाढवण्याचा आणि पूल करण्याचं नॅशनल हायवे अॅथोरिटीने काम सुरु केलं आहे. त्याबद्दल कोल्हापूर शहर आणि कागल शहरातील जनतेच्या तीव्र भावना असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहर आणि कागल शहरातील जनतेला असं वाटतंय की, शिरुर ते पंचगंगा पूल 2400 मीटर लांबीच्या मार्गावर पाणी वाहून जाण्यासाठी फक्त 34 मीटरची जागा उपलब्ध होणार आहे. मुळातच पंचगंगेला अनेकदा पूर आल्यामुळे कोल्हापूर शहर निम्म बुडालेलं आहे. या भरावामुळे फार मोठी अडचण येणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा भराव टाकून पूल होऊ देणार नाहीत अशी भूमिका जनतेनं घेतली आहे. तशीच परिस्थिती कागलमध्ये देखील असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Tags

follow us