Rohit Pawar On Eknath Shinde : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शालेय गणवेशावरुन जोरदार टीका केली. तसेच सभागृहात गणवेश दाखवताना रोहित क्वालिटी बघ, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकाची क्वालिटी? असा सवाल रोहित पवारांनी व्यक्त केला.
#मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका…..अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था… https://t.co/lmKNmlPukG pic.twitter.com/4XfT8GVv2X
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 30, 2024
मोठी बातमी! रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या वाहनाचा अपघात; अपघातात..,
राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाच्या दर्जावरून नवा वाद निर्माण झाला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. एका शालेय विद्यार्थ्याचा व्हिडिओ करत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, मुख्यमंत्री साहेब आठवतं का? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता, तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक हतो. पण, आता या गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
Chinese Military : अमेरिकेकडून तैवानला मोठी लष्करी मदत, चीनने दिला इशारा
पुढं त्यांनी लिहिलं की, सभागृहात गणवेश दाखवतांना ‘रोहित क्वालिटी बघ’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वत:चे खिसे भरून घेणाऱ्या सरकारची हिशोब कऱण्याची वेळ आता जवळ आली. आणि जनता हा हिशोब चुकता करेलच, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची घोषणा केली. या गणवेशांचा दर्जा आणि रंग एकसमान असावा, यासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी शासनाच्या खरेदी धोरणांनुसार निविदा प्रक्रिया राबवून कापड पुरवठा सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. सभागृहात दोन गणवेश दाखवून गणवेश किती चांगले दिले जात आहे, असं म्हटलं होतं. दरम्यान, या गणवेशावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.