Chinese Military : अमेरिकेकडून तैवानला मोठी लष्करी मदत, चीनने दिला इशारा

  • Written By: Published:
Chinese Military : अमेरिकेकडून तैवानला मोठी लष्करी मदत, चीनने दिला इशारा

Chinese Military : एकीकडे इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले सुरु असल्याने जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने मोठी घोषणा करत तैवानला $567 दशलक्ष संरक्षण सहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चीनच्या धमक्या आणि दररोजच्या लष्करी हालचाली पाहता अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वी देखील अमेरिकेने तैवानला मोठी मदत केली होती. तर दुसरीकडे औपचारिक धोरणात्मक भागीदारी नसतानाही, ते तैवानला पूर्णपणे मदत करते. त्याचबरोबर अमेरिकेने तैवानला शस्त्रे पाठवणे बंद करावे, अशी मागणी चीनने केली आहे.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार तैवानला मदत करण्यासाठी $567 दशलक्ष किमतीचे संरक्षण उपकरणे, सेवा आणि लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

तैवानच्या लष्कराने दावा केला होता की, रविवारी सकाळीही चीनकडून अनेक रॉकेट डागण्यात आले. काही दिवसांपूर्वीच चीनने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. गेल्या आठवड्यात चिनी सैन्याने तैवानभोवती आपल्या हालचाली वाढवल्या होत्या.

महाविकास आघाडीच्या जागांची अदला-बदल होणार… शरद पवारांनी दिले संकेत

रविवारी 9 चिनी लष्करी विमाने आणि 4 नौदल जहाजांची उपस्थिती पुष्टी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 8 चिनी विमानांनी तैवानच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व हवाई संरक्षण झोन पार केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube