महाविकास आघाडीच्या जागांची अदला-बदल होणार… शरद पवारांनी दिले संकेत
Sharad Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपांसाठी बैठका सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीकडूनही जागावाटपाच्या बैठकीवर जोर देण्यात येत आहे. अशातच आता जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलंय. महाविकास आघाडीच्या जागांमध्ये अदला-बदल होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांना दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकरित्या बातचीत करताना शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत.
अजित पवारांचा एक फोन अन् उमेदवाराच्या नावाची घोषणा; रामराजे नाईक निंबाळकरांना हसू अवरेना
शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीं सरकार आणणं हेच आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा ठिकाणी जागांची अदला-बदल होऊ शकते, जेवढ्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे, तेवढ्या जागा महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला दिल्या जाऊ शकतात, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
मायलेकाच्या नात्याला काळीमा! दोन मुलांनी आईला झाडाला बांधले अन् जिवंत जाळले
तसेच आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेतोयं तसं सत्ताधारीदेखील घेत आहेत. विधानसभा निवडणुकीला शरद पवार गटाचं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हेच चिन्ह राहणार असून विधानसभेला आम्ही ट्रम्पेट रद्द करा, अशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे , मात्र आम्हाला अजून दिलासा मिळाला नसल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा आमदार निवडून आल्यानंतरच घेणार आहोत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आरक्षणाचा संघर्ष वाढला असून मराठवाड्यातील हा वाद कसा मिटवता येईल हा आमचा प्रयत्न असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलंय.
नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, बिहारला पुराचा धोका
अमित शाहांनी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे..,
राज्यातील बुथ पातळीवरचा कार्यकर्ता फोडा, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. देशाचे गृहमंत्रीच असं म्हणत आहेत, त्यामुळे आता अमित शाहा यांनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला फायदा होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.