नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, बिहारला पुराचा धोका

  • Written By: Published:
नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, बिहारला पुराचा धोका

Nepal Flood News : नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. (Nepal Flood) भूस्खलन आणि पुरामध्ये सुमारे ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे.

विजेचा पुरवठा खंडित

नेपाळला पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप 79 जण बेपत्ता आहेत. काटमांडू खोऱ्यातील १६ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३००० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं आहे. सध्या देशातील ६३ ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाले आहेत. नेपाळमध्ये अनेक भागात विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काटमांडूमधील २२६ गावे पाण्याखाली गेले आहेत.

Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा तो  निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

कार्यकारी पंतप्रधान आणि नागरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेतली. यावेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर हालचाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्च ऑपरेशनला गती देण्याचे आणि बचावकार्याला गती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्यात. मुसळधार पावसामुळे नेपाळमधील सर्व शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचे आणि नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

पावसाचा बिहारला धोका

नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहार सरकारने राज्याच्या उत्तर भागात पुराचा धोका जाहीर केला आहे. नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये वाहत येणाऱ्या गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रातील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.

नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गंडक, कोसी आणि बागमती नदीपात्रात पुरस्थिती आहे. याचा फटका बिहारमधील १३ जिल्ह्यांना बसला असून यामुळे १,४१,००० लोक प्रभावित झाले आहेत. पश्चिम चंपारन, पूर्व चंपारन, शिवहर, गोपालगंज, शिवन, सितामर्ही, अरारिया, क्रिष्णकुंज, पुर्णिया, सुपौल, मधेपुरा, मुजफ्फरपुर आणि मधुबनी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरु केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube