जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत, त्यांची शरद पवार अन् CM शिंदेंशी कमिटमेंट, हाकेंचा दावा…
Laxman Hake : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC reservation देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करत आहे. त्यांच्या या मागणीला लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) विरोध केला. दरम्यान, जरांगे-हाके यांच्यात सतत शाब्दीक चकमकी घडत आहे. आज पुन्हा एकदा हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला.
दोन महिन्यात महायुती पिक्चरमधून आऊट होणार…; आमदार प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल
मनोज जरांगेंची शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कमिटमेंट झालीय, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकही उमेदवार उभे करणार नाहीत, असं हाके म्हणाले.
लक्ष्मण हाकेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या बैठकीत वाळू माफिया आणि दोन नंबरचे धंदे करणारे असतात. असे लोक निवडणूक लढणार असतील तर त्यांचे त्यांचे स्वागतच असेल. जिथे चांगल्या लोकांना 4 आमदार निवडून आणतांना दमछाक होते, तिथे हे 288 उमेदवार निवडून आणायला निघालेत. त्यांचे उपोषण सुटल्यानंतर त्यांना गाड्या कुणी पुरवल्या? त्यांना कुणी पाठबळ दिले? आदल्या रात्री राजेश टोपे भेटून जातात आणि दुसऱ्याच दिवशी जरागे रुग्णालयात दाखल होतात. आम्ही काही मोघम बोलत नही. जरांगे यांचे उपोषण कोणत्याही शिष्टमंडळाशिवाय, सुटले हे आमच्या आंदोलनाचे यश आहे, असं हाके म्हणाले.
India vs Bangladesh Live : अश्विनने रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा मोठा विक्रम
पुढं ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी कमिटमेंट झाली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकही उमेदवार उभे करणार नाहीत. मी हे बाँड पेपरवर लिहून देतो, असंही ते म्हणाले.
संभाजीराजे- जरांगेंमध्ये पुतना माशीचे प्रेम
लक्ष्मण हाके यांनी यावेळी संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला. हाके म्हणाले, हे सगळे वात-भिजलेले तोटे आहेत. बच्चू कडूंमधला आंदोलक केव्हाच संपला. तर संभाजी राजे व जरांगे यांच्यात पुतना माशीचे प्रेम आहे. संभाजीराजे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहेत. त्यांचा लोटा कधी लवंडेल हे कुणीही सांगू शकत नाही. विशेषत: संभाजी भोसले हे जरांगेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत, तर जरांगे यांना भोसलेंचं नेतृत्व मान्य नाही, असंही ते म्हणाले.