Download App

मध्य प्रदेशात हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी

MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP Election 2023) काँग्रेसच्या पराभवानंतर हायकमांड अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. हायकमांडने कमलनाथ (Kamalnath) यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशात दारुण पराभव झाल्यानंतर हायकमांड कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी भाजपच्या शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh chauhan) यांच्यासारखी सक्रियता दाखवली नाही, असे हायकमांडला वाटते. काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यांना काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते पण निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला नाही.

भाजपने मध्य प्रदेश विधानसभेत 230 पैकी 163 जागा जिंकून दोनतृतीयांश बहुमत मिळवले, तर काँग्रेस 66 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता पक्षाचे हायकमांड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू कमलनाथ राहिले. त्यामुळे काँग्रेसचेही नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय इतर अनेक राजकीय अर्थही त्यातून काढले जात आहेत. कमलनाथ आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाले असले तरी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीसोबत जाणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

कमलनाथ यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या महाकौशलमध्येही भाजपने यावेळी चांगली कामगिरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसने छिंदवाडा जिल्ह्यात कमलनाथ यांच्या प्रभावाखाली सर्व 7 जागा जिंकण्यात यश मिळविले आहे. मात्र महाकौशलमधील 8 जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे.

‘मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न’; प्रकाश सोळंके स्पष्टच बोलले…

जबलपूर, छिंदवाडा, बालाघाट, सिवनी, नरसिंहपूर, मंडला, दिंडोरी आणि कटनी जिल्हे मध्य प्रदेशातील महाकौशल भागात येतात. या 8 जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा असून, या निवडणुकीत भाजपचे 21 उमेदवार विजयी झाले आहेत. कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. कमलनाथ सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले तरुण भानोत आणि विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांच्यासह विधानसभेचे उपसभापती हिना कांवरे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Tags

follow us