Download App

‘मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न’; प्रकाश सोळंके स्पष्टच बोलले…

Prakash Solanke News : मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कथित ऑडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त विधान केल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंकेंचं घरच पेटवलं होतं. त्यावरुन राज्यात चांगलच वादंग पेटलं होतं. जाळपोळच्या घटनेनंतर सोळंके यांनी घटनेचे प्रत्यक्ष पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर आता मलाच व्हिलन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोळंके यांच्याकडून केला जात आहे.

भाजपच्या बंपर विजयाने मोदी-शाह टेन्शन फ्री : CM शिंदे अन् अजितदादांना मात्र धोक्याची घंटा

प्रकाश सोळंके म्हणाले, 30 ऑक्टोबरला मी घरात होतो दगडफेक जाळपोळ करणाऱ्यांना मी पाहिले नसून याप्रकरणी फिर्याद देखील दिलेली नाही. पोलिसांना जवाब सुद्धा दिलेला नाही, मी एकाही व्यक्तीचे नाव सांगितलेले नाही. मात्र, उपलब्ध रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहे. प्रत्यक्ष जाळपोळ दगडफेक प्रकरणात ज्यांच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे आहेत त्यांनाच आरोपी करावे, असं सोळंके यांनी म्हटलं आहे.

तसेच, राजेंद्र होके ,रामचंद्र डोईजड, अजय राऊत ,लखन सावंत यांचा दगडफेक व जाळपोळ प्रकरणी काहीही संबंध नाही, त्यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. निरपराध लोकांना पोलिसांनी अडकवू नये आमदार या नात्याने मी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. “मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न केला जातोय” लवकरच सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओसह आपण फेसबुक लाईव्ह करणार असल्याचं आमदार सोळंके यांनी सांगितले आहे.

Share Market : भाजपच्या दणदणीत विजयानंतर Investor सुसाट; झोळीत आले 4 लाख कोटी

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अजित पवारग गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजूही मांडली. त्यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांचा जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेमागे कोणते लोक होते, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती दिली.

जमावात काळाबाजार करणारे लोक होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारेही काही होते. जे 300 जण आले होते ते तयारीनेच आले होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आले होते, असा गंभीर आरोप सोळंके यांनी केला होता.

Tags

follow us