Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर रिलीज

Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर रिलीज

Pillu Bachelor Trailer Released: मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये नवनवीन विषयांवर अनेक सिनेमा रिलीज होताना दिसत आहेत. आता दमदार स्टारकास्ट असलेला एक मजेशीर मराठी सिनेमा “पिल्लू बॅचलर” (Pillu Bachelor) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच (Pillu Bachelor Trailer) रिलीज झाला असून सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चेत आहे. हा मजेशीर ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता बघायला मिळत आहे.

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या सिनेमाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी लिहिलेल्या या मजेशीर सिनेमाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम सिनेमा तानाजी घाडगे यांनी या अगोदर दिले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

या सिनेमात पार्थ भालेराव, सायली संजीव (Sayali Sanjeev), अक्षया देवधर (Akshaya Deodhar), शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले अशी तगडी स्टारकास्ट आहेत.

सीआयडीमधील फ्रेडी भूमिका साकारणारे दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका, व्हेंटिलेटवर उपचार सुरू

वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. परंतु प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका सिनेमात असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं आहे. त्यामुळे हा मराठी सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे.  ‘पिल्लू बॅचलर’नं नावापासूनच मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे मनसोक्त हसवणुकीसाठी चाहत्यांना केवळ 15 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube