Panchak Teaser Released: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज

Panchak Teaser Released: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज

Panchak Movie Teaser Released: पाच नक्षत्रांच्या एका विशिष्ट कालावधीला पंचक (Panchak Movie ) म्हटले जाते. यामध्ये शुभ अशुभ घडले, की ते पाच पटीने वाढत असते. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ (Marathi Movie) या मराठी सिनेमाचा उत्कंठा वाढवणारा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर (Social media) रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक सिनेमा आहे. 5 जानेवारीला रिलीज होणाऱ्या या मराठी सिनेमाची रंजक कथा दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे असून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांची निर्मिती आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माता असणार आहेत.

या मराठी सिनेमाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे. उत्कंठा वाढवणारा जबरदस्त टीझरमध्ये बघायला मिळत आहे की, पंचकमुळे सर्वांची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता नेमकं कोणाचं नंबर लागणार याची भीती वाटत आहे. हीच भीती विनोदी शैलीमध्ये सादर केली आहे. अनेकजण आपला जीव वाचवण्यासाठी काय सर्कस करणार हे बघायला नक्कीच मजा येणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने ही मराठमोळी जोडी, मराठी चाहत्यांसाठी हा खास सिनेमा घेऊन येणार आहेत.

यामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशा उत्तम कलाकारांची फौज मनोरंजन करताना दिसणार आहे. माधुरी दीक्षित या सिनेमाबद्दल सांगितले आहे की, “पंचक’ ही आमची दुसरी निर्मिती असून यासाठी आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत आहोत.

‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; ‘आईच्या गावात मराठीत बोल’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

‘पंचक’ हा आम्ही खूप मनापासून बनवलेला सिनेमा असून नक्कीच चाहत्यांसाठी हा मनोरंजनाचा डोस ठरणार आहे, याची मला खात्री आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार ‘पंचक’चा भाग आहेत. हळूहळू अनेक गोष्टी समोर येणारच आहेत. टीझर बघून चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्या- फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘पंचक’मधून करण्यात आला असून सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक कॅामेडी यांचा मेळ या सिनेमात बघायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारीला ‘पंचक’ घेऊन आम्ही येत आहोत, जो सर्वांना वर्षभर आनंदी ठेवणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube