Download App

निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीसोबत जाणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar News : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला(India Alliance) म्हणावं तसं यश मिळालेलं दिसत नाही. पाचपैकी तीन राज्यांच भाजपने ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या एकजूटीवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही(Prakash Ambedkar) मोठं विधान केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतरही ‘इंडिया’ आघाडीसोबत जाण्याची इच्छा आंबेडकरांनी दर्शवली आहे. मुंबईतून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच खोटा गुन्हा’; गुन्हा मागे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचा मोर्चा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही तर अगोदरपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छूक आहोत. पण, आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही, हेही आम्हाला कळत आहे. तरीही आम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास तयार आहोत’, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

निकालाचे विश्लेषण करायला अजून वेळ आहे. भाजपाच्या विजयाचे कारण काय? हे निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर माहिती टाकल्यावर बारकावे लक्षात येतील. पण निकालावरुन दिसून येतं की भाजपची पिछेहाट होतीय असं एक नॅरेटीव्ह सुरु होतं ते वस्तुस्थितीला धरुन नाही असं म्हणाता येईल.

“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला

तीन राज्यातील पराभवामुळे काँग्रेसची इंडिया आघाडीतील बारगेनिंग पॉवर कमी होईल का? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेसची आघाडी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आहे. ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांसोबत त्यांची आघाडी व्हायची आहे. त्यामुळे बारगेनिंग पॉवर कमी झाली असं म्हणता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तेलंगणात ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, मुस्लीम व्होटबँक कोणाच्या पारड्यात?

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर आंबेडकर म्हणाले की ही मागणी मी अगोदर पण केली आहे. लोकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. कायद्यात बॅलेट किंवा ईव्हीएम वापरा हे दोन्ही पर्याय आहेत. 2004 ला देखील माझा पराभव झाल्यानंतर मी म्हटलं होतं की मला लोकांनी पाडलं नाहीत तर ईव्हीएमने पाडलं. दुर्दैवाने आपल्याकडील इंजिनियर जी मांडणी केली पाहिजे ती करत नाहीत, असे त्यांनी म्हटलं.

Tags

follow us