प्रकाश आंबेडकरांना अटक करा; दंगलीच्या विधानावरून दंड थोपटत राणेंची मोठी मागणी

  • Written By: Published:
प्रकाश आंबेडकरांना अटक करा; दंगलीच्या विधानावरून दंड थोपटत राणेंची मोठी मागणी

Narayan Rane On Prakash Ambedkar : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची (Riot) शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंबेडकरांविरेधात FIR दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. दंगली घडतील अशी विधानं करणाऱ्यांनी दंगलींचा आधार सांगावा अशी मागणीदेखील केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

NCP : ‘2004 चं गुपित फोडा; 5 गौप्यस्फोट करत तटकरेंची अजितदादांना साद

राणेंची मागणी काय? 

प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो दंगली विषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्याची दखल घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी, दंगलींची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती पोलिसांनी घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी अशी मागणीही राणेंनी केली आहे. दंगलीचा आधार सांगा असे म्हणत इथे दंगल होणार.. तर प्रूफ द्यावा लागतो, कोण करणार? कशी दंगल होणार? कुठे करणार? राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावं असा टोलादखील राणेंनी यावेळी लगावला.

काहीच मोफत देऊ नका; 70 तास कामाच्या विधानानंतर नारायण मूर्तींच्या टार्गेटवर ‘फुकटे’ लोकं

दंगलीबाबत प्रकाश आंबेडकरांचा दावा काय होता?

राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 28 नोव्हेंबर रोजी पुण्यात केला होता. त्यानंतर आता राणेंनी थेट आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी असे म्हणच दंड थोपटले आहेत. राणेंच्या या मागणीवरून आता भाजप आणि वंचितमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, प्रकाश आंबेडकर यावर नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut : राज्यातले ‘सुलतान’, ‘डेप्युटी सुलतान’ प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

जरांगे पाटील अजून लहान त्यांनी अभ्यास करावा 

यावेळी नारायण राणेंनी राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील वयाने लहान आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथम आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नसल्याचाही पुनुरू्चार राणेंनी यावेळी केला.

राऊतांच संरक्षण काढण्याची वाट बघतोय

राणेंनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचाही समाचार घेतला. संजय राऊतांकडे आक्रमकता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, शिंदे सरकार राऊतांचे संरक्षण कधी काढतात याची मी वाट बघतोय. सुशांत सिंह केसमध्ये आदित्य ठाकरे तुरूंगात जातील आणि त्याठिकाणी राऊत आदित्यला साथ देण्यासाठी सोबत असतील असा दावाही यावेळी राणेंनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube