Prakash Ambedkar: महिला आरक्षणाची बिजे कोणी रोवली? प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं

Prakash Ambedkar: महिला आरक्षणाची बिजे कोणी रोवली? प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं

Prakash Ambedkar on Women’s Reservation : देशात सध्या महिला आरक्षण विधेयकावरुन(Women’s Reservation Bill) वादंग पेटलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही(Prakash Ambedkar) उडी घेतली आहे. महिला आरक्षणाचे बिजे काँग्रेस-भाजपने नाहीतर बाबासाहेबांनी रोवली असल्याचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. यावरुन महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलं आहे.

Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, महिला आरक्षण आणि सक्षमीकरणाची बिजे रोवण्याचे काम काँग्रेसने केले ना, ना भाजपने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते केले. काँग्रेस जर ओबीसीची बाजू घेत आहे तर त्यांनी या विधेयकात ओबीसींचा समावेश करण्याच्या कलमांमध्ये दुरुस्ती का केली नाही? असा सवालही आंबेडकरांनी काँग्रेसला केला आहे.

दिल्ली दौऱ्यात ठरवली नार्वेकरांनी रणनीती; आता ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची सुनावणी

काय म्हणाले होते राहुल गांधी?
मला या विधेयकात ओबीसी आरक्षणाचा समावेश पाहायला आवडेल. यामुळे भारतीय महिलांच्या मोठ्या भागाला या आरक्षणात प्रवेश मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते या विधेयकात नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते.

Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

सुजात आंबेडकरांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर :
इंडिया आघाडी आम्हाला आपल्यात सामावून घेत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही निवडणूकच लढायची नाही का? आम्हाला जो सल्ला दिला जातोय, तोच सल्ला तुम्ही तुमच्या पक्षांना का देत नाही? देशातील वंचितांनी आणि बहुजांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का? जसं तुम्ही शतकानुशतके करत आला आहात, असं प्रत्युत्तर सुजात आंबेडकरांनी दिलं आहे.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडले गेले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेनंतर राज्यसभेतही हे विधयेक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 215 मते मिळाली. त्यामुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवीन संसदेत हे पहिलंचं आणि ऐतिहासिक विधेयक मंजूर झाल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube