Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

  • Written By: Published:
Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

नगर :  धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी (ST) संवर्गामध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी  चौंडीत गेल्या पंधरा दिवसापासून यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आता येथील एका उपोषणकर्त्याची प्रकृती आणखी खालावली आहे. सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणास्थळीच ऑक्सिजन (oxygen) लावण्यात आला आहे. त्यांनी काल (ता. २०) पासून पाणी देखील सोडले आहे.

https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0

धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं, या मागणीसाठी माजी मंत्री बाळासाहेब दोडातळे यांच्या नेतृत्वाखाली चौंडीत उपोषण सुरू आहे. अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर अशी उपोषणाला बसलेल्यांची नावे आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १९ तारखेला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना 15 तारखेला प्रथम अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आले. त्यानंतर सुरेश बंडगर यांची तब्येतही खालावली आहे. त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला आहे

India Canada Row मुळं महागाई वाढणार; सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार? 

दरम्यान, दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदतही संपल्याने आता उपोषणकर्त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सरकारचा कोणताही संदेश घेऊन कोणी आले नाही. चौंडी येथील उपोषणकर्त्यांनी सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवा यासाठी काल जलत्याग केला होता. या आंदोलनाची आक्रमता लक्षात घेऊन सरकारने आज तातडीने बैठक बोलावली होती.

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना

आज धनगर आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक पार पडली. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत, त्या लागू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये धनगर समाजाचा प्रतिनिधीही असणार आहे. याशिवाय आंदोलनादरम्यान दाखल झालेले पोलिस गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube