Download App

2 महिन्यांनी शिवसेनेचा CM असेल, राऊतांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा अन् तुफान फटकेबाजी

Sanjay Raut On Eknath Shinde : शिवाजी पार्कवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) खासदार संजय राऊत

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Eknath Shinde : शिवाजी पार्कवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजप (BJP) नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच पुढील दोन महिन्यानंतर शिवसेनेचा (Shiv Sena) मुख्यमंत्री होणार असं म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आहे.

यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आज पहिल्यांदा दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाषण केलं आहे आणि ही शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे आज मोठ्या आशेने महाराष्ट्र बघत आहे असं संजय राऊत या मेळाव्यात बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज सकाळी नागपुरात शस्त्र पूजा झाली. या देशात सुद्धा अनेक शस्त्र आहे पण आता आमच्या शस्त्रात एक नवीन शस्त्र आलं आहे ते म्हणजे मशाल आणि या मशालीला देखील यापुढे शस्त्रचा दर्जा द्यावे लागले अश्या प्रकारचा शस्त्र आता आमच्या हाती आलं आहे असेही यावेळी ते म्हणाले. तसेच हा निष्ठावंताचा महाराष्ट्राचा आहे. हा स्वभिमानाचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे.

दोन दिवसापूर्वी रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झालं. उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही करत कारण उद्योजग आपलं वाटत नाही पण टाटा गेल्यावर देश हळहळला, रडला याचा कारण म्हणजे गेल्या अनेक वर्ष टाटा म्हणजे विश्वास असा होता मात्र विश्वाचा दुसरा नाव म्हणजे ठाकरे हे देखील आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्र ठाकरेंच्या मागे उभे राहील. ही देवाची आळंदी आहे आणि चोरांची आळंदी आझाद मैदानात भरली आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लावला.

आझाद मैदानात चोरांचा मेळावा भरला आहे. मैदानाचा नाव आझाद मैदान आहे मात्र व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम आहे. त्या आझाद मैदानाची लाज राखा, गुलामांचा मेळावा आणि आझाद मैदान नाव. त्यांनी खरं म्हणजे हा मेळावा सुरतला घेतला पाहिजे होता कारण त्यांच्या पक्षाचा जन्म महाराष्ट्रात झाला नसून सुरतच्या गर्भातून झाला. अशी टीका देखील यावेळी शिंदे गटावर संजय राऊत यांनी केली.

अभिनेता सयाजी शिंदे नंतर सुरज चव्हाणही अजितदादांच्या पक्षात? ‘त्या’ भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण

तसेच दोन महिन्यानंतर जेव्हा आपलं सरकार येणार तेव्हा आपण त्यांना सांगू तुम्ही हा मेळावा गुजरातला घ्या कारण तुमचा जन्म तिकडे झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदी आणि शहाचा दारुण पराभव केला. त्यामुळे हा दसरा मेळावानसून विजय मेळावा आहे असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले. तसेच दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा विजय मेळावा घ्याचा आहे आणि त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल असेही संजय राऊत म्हणाले.

follow us