एकनाथ शिंदे हेच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा…; संजय शिरसाटांचे मोठे विधान
Sanjay Shirsat : आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) तोंडावर येऊन ठेपली. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात थेट लढत होणार आहे. त्याआधी दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा पेच कायम आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं.
…तर आम्ही तुम्हाला खासदार, मंत्री बनवू; विधानसभेसाठी भाजपकडून मुस्लिम समाजात जनजागृती
शिवसेनेची ताकद वाढली असून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनेचा स्ट्राइक रेट वाढला आहे. त्यामुळं आमची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. आम्ही किती जागा मागणार यावर मी आता बोलणं योग्य ठरणार नाही. कारण मी जर आकडा सांगितला तर मग वाचाळवीरांना आवरा, अशी टीका देखील होऊ शकते.
बलात्कार नंतर हत्या, आरजी कार प्रकरणात सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
ते म्हणाले, शिवसेनेची ताकद वाढली, शिवसेनेचा स्ट्राईक रेटही वाढला. स्ट्राईक रेटही वाढल्याने एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असणार आहेत, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच फरक पाहायला मिळेल. यामुळे आता अलर्ट राहण्याची गरज आहे. राजकारणात रोज नवनवे प्रयोग सुरू असतात, कुणी काय करेल याचा काही नेम नाही, अशी टिप्पणी शिरसाट यांनी केली.
अपक्षांचा टेकू आम्हाला लागणार नाही
आम्ही दसऱ्याची वाट पाहतोय. दसरा मेळ्यात बरेच काही घडू शकतं. 20-25 अपक्ष आमदार यंदा विधानसभेत मुख्यमंत्रिपदाची दोर घेऊ शकतात. जर समीकरणे वर-खाली गेलं तर. पण, सध्या महायुती जोरात आहे, असं सूचक विधान करत संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीचं काही खरं नाही, त्यांची युती होणार की नाही, माहित नाही. पण अपक्षांचा टेकू आम्हाला तरी लागणार नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हेच महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहऱा असणार या शिरसाटांच्या वक्तव्यावर भापज नेते आणि अजितदादा गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.