Assembly Election BJP Candiate List : राज्यात विधानसभेसाठी निवडणुका (Assembly Election) जाहीर झाल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने (BJP) लोकसभेला केलेली चूक टाळण्यात येणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. महायुतीचा जागावाटपाचा मुहूर्त ठरला असून पुढील दोनच दिवसांत जागावाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीयं.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, CRPF करणार व्हीआयपींची सुरक्षा, एनएसजी कमांडोंची ‘सुट्टी’!
लोकसभेला उशीरा जागा वाटप जाहीर केल्याने महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला महायुतीने लवकरात लवकर जागा वाटप अंतिम करण्याचे ठरवले आहे. आज झालेल्या एकत्रित पत्रकार परिषदेनंतर येत्या दोन दिवसांत जागा वाटप जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलीयं.
भाजपकडून 25 उमेदवारांची यादी तयारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारसंघ निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. मात्र, भाजपच्या या पहिल्या यादीतून 6 विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे.
बीसीसीआयने का रद्द केला इम्पॅक्ट प्लेअर? नियम अन् अटी काय? जाणून घ्या, सविस्तर..
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदेंना करून दिली. जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलायं. ‘मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केलायं त्यामुळे जागावाटपात शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हटलंय. या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला मात्र, दोन ते तीन जागांमुळे हा तिढा कायम राहिल्याचं दिसून आलं होतं. त्यामध्ये नाशिक, आणि वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन महायुतीत घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर उशिराने जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर महायुतीने आपले उमेदवार घोषित केले होतं. आता ही चूक विधानसभा निवडणुकीला महायुतीकडून टाळली जाणार आहे. त्यामुळे त्याआधीच भाजपच्या 25 उमेदवारांची नावे जाहीर केल्याचं सांगण्यात येत आहे.