Vidhansabha Election : विधानसभेची (Vidhansabha Election) आचारसंहिता जाहीर झाली, मतदानाची तारीखही निश्चित झाली. त्यानंतर आता महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपांच्या बैठक होत आहे. अशातच मविआतील घटक पक्ष असलेल्या शेकापने महाविकास आघाडीकडे २० जागांची मागणी केली. आपल्याला पारंपारिक 20 जागा सोडाव्यात अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.
बाळासाहेब आजबेंना निवडणूक जड जाणार? शरद पवारांचे विश्वासू राम खाडे मैदानात उतरणार
जयंत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात होते.
मात्र, या नाराजीकडे दुर्लक्ष करत शेकाप आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांत जागावाटपाची खलबतं सुरू आहेत. मात्र, काँग्रेसवर नाराज असलेल्या जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे. आपल्या पारंपरिक 20 आपल्याला सोडण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाने साक्री, मालेगाव यातील जागांसह शिंदखेडा, धुळे ग्रामीण, बागलाण, नवापूरमधील जागा मागितल्या आहेत. लोकसभेला या जागांवर आम्हाला जास्त फायदा झाला आहे. त्यातील काही मतदारसंघ आम्हाला मिळावेत, असा दावा त्यांनी केला.
निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार, नगरमध्ये चार जागा मिळणार?
या पारंपरिक 20 जागांच्या संदर्भात महाविकास आघाडीशी चर्चा झाली आहे. अनेक जागा आमच्या काही फरकाने गेल्या आहेत. त्या जागा आम्हाल हव्यात,असं पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी मागितलेल्या जागा न मिळाल्यास ते माविआला सोडण्याचा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जयंत पाटलांची नाराजी कायम
जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला. विधानपरिषदेच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला मतदान केले नाही, असा आरोप पाटील यांनी केला होता. विधान परिषदेच्या निकालापासून जयंत पाटील काँग्रेसवर नाराज आहेत. काँग्रेसने माझा विश्वासघात केला. याचा अनुभव मी विधान परिषदेत घेतला आहे. काँग्रेसच्या मते फुटली. दुसऱ्या पसंतीची मते मला न मी हरलो, अशी खदखद त्यांनी पुन्हा बोलून दाखवली.
दरम्यान, महाविकास आघाडीचे मुंबईतील 90 टक्के जागावाटप पूर्ण झाले. मात्र तीन जागांचा तिढा अद्यापही कायम असून तो उद्यापर्यंत सोडवला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट मुंबईतील जागांच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.