Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhansabha Election) महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने (Mahayuti) यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, राज्यातील एकूण 288 मतदारसंघापैकी 73 मतदारसंघात विजयी प्राप्त करणं मविआ आणि महायुतीला चांगलचं कठीण बनलं.
जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ‘जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार…’
यंदा मविआ आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय, प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी, मनसे, असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्ष स्वबळावर नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे.
सत्वपरीक्षा घेणारे 73 मतदारसंघ
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. तर आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते. गेल्या निवडणुकीत पाच जागांवर जय-पराजयाचा फरक हा एक हजार मतांपेक्षा कमी होता, तर चार जागांवर जय-पराजयचा फरक हा एक हजार ते दोन हजार मतांचा होता. 28 जागांवर जय-पराजयाचा फरक 2 हजार ते 5 हजारांचा होता. तर 36 मतदारसंघ असे होते, जिथं 5 ते 10 हजार मतांचा फरक होता.
दरम्यान, या 73 जागांवर गेल्या निवडणुकीत विजयाचा फरक 10,000 मतांपेक्षा कमी होता, या जागांवर काही मते कमी जास्त झाली तर सगळा सत्तेचा खेळ बदलू शकतो.
73 मतदारसंघापैकी भाजकडे 28 जागा…
गेल्या निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर कमी फरकाने 73 जागांपैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 15, काँग्रेसने 12 आणि शिवसेनेने 5 जागा जिंकल्या होत्या. तर 13 जागा इतर आणि अपक्षांनी जिंकल्या होत्या.
एक हजारापेक्षा कमी फरकाच्या पाच जागा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय आणि पराभवाचा फरक एक हजार मतांपेक्षा कमी होता. चांदिवली, अर्जुनी-मोरगाव, दौंड, सांगोला आणि कोपरगाव या जागा होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन तर भाजपने एक जागा जिंकली होती. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे अवघ्या 409 मतांनी विजयी झाले होते. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन 718 मतांनी विजयी झाले. दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल शुभसराव 746 मतांनी विजयी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील 768 मतांनी आमदार झाले होते. याशिवाय कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष अशोकराव काळे हे केवळ 822 मतांनी विजयी झाले होते.
एक ते दोन हजार हजारापेक्षा कमी फरकाच्या जागा
गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील चार विधानसभा जागांवर एक हजार ते दोन हजार मतांचा फरक होता. भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड या त्या जागा आहेत. भिवंडी पूर्व मतदारसंघातून सपाचे रईस शेख 1314 मतांनी विजयी झाले होते. मूर्तिजापूर मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे 1910 मतांनी विजयी झाले होते. मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष चंद्रकांत निंबा पाटील 1957 मतांनी विजयी झाले होते. बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संदीप रवींद्र श्रीसागर 1984 मतांनी विजयी झाले. 1,000 ते 2,000 च्या फरकाने चार जागांपैकी सपा, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.
संजय राऊतांना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती
पात हजारापेक्षा कमी फरकाच्या जागा
तर 28 जागा अशा होत्या, जिथे विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचा फरक 2 हजार ते 5 हजार इतका होता. या जागा धुळे, नेवासा, रामटेक, भोकरदन, पुसद, हदगाव, भोकर, नयागाव, देगलर, मुखेड, उदगीर, अहमदपूर, सोलापूर मध्य, शिरोळ, कराड उत्तर, कराड दक्षिण, सांगोला, महाडी, पुणे कँट, मावळ, चेंबूर, चांदिवली आहेत. याशिवाय, माजलगाव, भांडुप, मालाड पश्चिम, डिंडोसी, नाशिक मध्य, डहाणू आणि धुळे शहर या मतदारसंघातही पाच हजार मते जास्त मिळाल्याने उमेदवार विजयी झाले होते.
2019 मध्ये 2 हजार ते 5 हजारांच्या फरकाने भाजपला 12 तर राष्ट्रवादीने 6 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने चार तर शिवसेनेला दोन जागा जिंकण्यात यश आले. याशिवाय धुळ्यात असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने एक जागा जिंकली होती, तर बहुजन विकास आघाडी, भाकप आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.
पाच ते दहा हजारांच्या फरकाच्या जागा
गेल्या विधानसभा निवडणुकीत 35 जागांवर विजय-पराजयामध्ये पाच हजार ते 10 हजार मतांचा फरक होता. या जागा – शहादा, साक्री, अकोट, अमळनेर, चिखली, सिंदखेड राजा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्सी, नागपूर पश्चिम, तुमसर, साकोली, आमगाव, चिमूर, राळेगाव, पुसद, वर्सोया, उमरखेड, बसमाठ, कळवण, नाशिक पश्चिम, कल्याण ग्रामीण, वांद्रे पूर्व, उरण, जुन्नर, भोर, शिवाजीनगर, पुणे कँट, गेवराई, करमाळा, कोरेगाव, कराड दक्षिण, हातकणंगले आणि सांगली मतदारसंघ.
2019 मध्ये, ज्या जागांवर 5 ते 10 हजारांच्या दरम्यान विजय-पराजयाचे अंतर होते, त्यापैकी भाजपने 14 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्या. सहा जागा राष्ट्रवादीने, तीन जागा अपक्ष, एक जागा शिवसेनेने तर तीन जागा इतर उमेदवारांनी जिंकल्या.
थोडक्यात, गेल्या विधानसभा निवडणुकीत 73 विधानसभा मतदारसंघात जय-पराभवाचा फरक दहा हजारांपेक्षा कमी होता. या जागांवर यंदा काही मतं जरा इकडं तिकडं झाली तर सारा खेळच बिघडू शकतो, त्यामुळे या जागा काहींना घाबरवणाऱ्या तर काहींना आशा निर्माण करणाऱ्या आहेत.