Bacchu Kadu On BJP : राज्यात विधानसभेसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मुख्य लढत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे परिवर्तन आघाडी (Parivartan Aghadi) देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज नालासोपारा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आघाडीचे उमेदवार धनंजय गावडे (Dhananjay Gawde) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केला आहे.
जाती व धर्माच्या आधारावर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे. असं त्यांनी या सभेत म्हटलं आहे. या सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असताना धर्म आणि जातिवर राजकारण करणे योग्य नाही. असं बच्चू कडू म्हणाले.
तसेच जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना ‘कटेंगे तो बटेंगे नही’ असे म्हणणे योग्य नाही. जनता आता जागरुक आहे आणि आता या व्यवस्थेविरोधात आवाज उठवत आहे. असं देखील बच्चू कडू म्हणाले.
या सभेत पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे, भाजपाने आपल्या कामावर निवडणुका लढवाव्यात. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु सध्या तो पक्षपातीपणा करत आहे. असा आरोप देखील यावेळी बच्चू कडू म्हणाले. तसेच गरिबांना रेशनच्या दुकानातून स्वस्त कांदा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
या सभेत आमदार बच्चू कडून यांनी लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार महागाई वाढवून मिळालेली रक्कम परत घेत आहे. अशी टीका त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केली.