Download App

धानोरी-पोरवालचा पाणी प्रश्न सोडवणार, विकासाचा अनुशेष भरून काढणार…; बापूसाहेब पठारेंची ग्वाही

धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे, हा संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार

  • Written By: Last Updated:

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या धानोरी, पोरवाल रस्ता परिसरातील झंझावाती पदयात्रेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळ मतदारसंघातील खास करून धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे, हा संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार आहे, अशी ग्वाही पठारे यांनी दिली.

पृथ्वीराज चव्हाणांना या निवडणुकीत धडा शिकवा; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल 

वडगाव शेरी मतदार संघात बापूसाहेब पठारे यांनी पदयात्रांचा धडाका लावला असून मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संवाद आणि संपर्क साधत ते विजयाचा दावा करत आहे. मतदारांना नावानिशी ओळखणारे उमेदवार म्हणून पठारेंची ख्याती आहे.

पठारे यांनी आज धानोरी भैरवनाथ मंदिर- खालची वाडी – विठ्ठल मंदिर – बुद्ध विहार – सिद्धार्थ नगर – ब्रह्मकुमारी केंद्र – मुंजाबा वस्ती – गणपती चौक – स्वप्नील ट्रेडर्स – चौधरी नगर – टिंगरे बंगला – मुंजबा वस्ती – धनेश्वर शाळा अशी प्रचार पदयात्रा काढली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक मतदार मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले. तुतारीचा आवाज बुलंद करीत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जयजयकार करीत पदयात्रेला प्रारंभ झाला.

आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शाहांचे CM पदाबाबत मोठं विधान 

युवती आणि महिलांनी बापूसाहेब पठारे यांचे औक्षण केले तर बापूसाहेब पठारे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी बापूसाहेब पठारे म्हणाले, मतदारसंघातील खास करून धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे.परिसरातील पाणी प्रश्न प्रामुख्याने हाती घेऊन सोडविणार आहे. संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार आहे.

पुढं ते म्हणाले, पोरवाल रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करणार आहे. लोहगाव, धानोरीला जोडणाऱ्या आणि विकास आराखड्यातील रखडलेल्या पोरवाल रस्त्याच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणार आहे. पोरवाल रस्ता चौकातील वाहतूक कोंडीचा यामुळे प्रश्न मिटणार आहे. या भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करून विकास करणार आहे, असं पठारे म्हणाले.

follow us